गटसाधन केंद्र (शिक्षण विभाग) पंचायत समिती वैजापूर या संकेतस्‍थळावर आपले सहर्ष स्‍वागत आहे.

प्रस्तावना

Books Logo
लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या आयुष्याची सर्वात महत्वाचे टप्प्यांपैकी एक असते. याच काळात मुलांचे बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासाचे बीज पेरले जाते. अक्षरओळख, संख्याज्ञान, संवादकौशल्य, सर्जनशीलता यासारखी मुलभूत कौशल्ये याच टप्प्यात विकसित होतात. एक प्रेमळ, सुरक्षित आणि ऊर्जा भरले शैक्षणिक वातावरण लहान मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करते. त्यामुळे प्रत्येक पालक, शिक्षक आणि शाळेचे कर्तव्य आहे की त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया मजबूत करून भावी उज्ज्वल भविष्यासाठी तयार करावे.
School Logo
शाळा हे केवळ ज्ञानाचे केंद्र नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे स्थान आहे. प्राथमिक शाळेत मुले समाजात वावरायला शिकतात, शिस्त, सहकार्य, आणि इतरांशी संवाद करणे यासारखी जीवनकौशल्ये आत्मसात करतात.
Students Logo
प्राथमिक शाळेचे महत्व

आत्मविश्वासाची निर्मिती

प्राथमिक शिक्षण मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि तर्कशक्ती विकसित होते, जे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी भक्कम पाया ठरते.

मूल्ये आणि संस्कार

शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेमळ वातावरणात मुलांमध्ये मूल्ये, शिस्त, सहकार्य, आणि इतरांबद्दल आदर भावना निर्माण होते.

सर्वांगीण विकास

शैक्षणिक ज्ञानाबरोबरच क्रीडा, कला, कथा, गाणी, नाट्य यांसारख्या उपक्रमातून मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास होतो.

उज्ज्वल भविष्यासाठी तयारी

प्राथमिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी मुलांना पुढील शिक्षणात आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तयार करते.

★ ★ ★ वैजापूर तालुक्याची शैक्षणिक माहिती ★ ★ ★
01
एकूण शाळा
वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषद 320 शाळा, नगरपरिषद 19 शाळा, खाजगी 105 शाळा आहेत.
02
अधिकारी वर्ग
तालुक्यात 1 गटशिक्षणाधिकारी, 18 केंद्रप्रमुख अशाप्रकारे संनियंत्रण अधिकारी वर्ग कार्यरत आहे.
03
शिक्षक संख्या
तालुक्यात जि. प. व्यवस्थापनाचे प्राथमिक व माध्यमिक असे एकूण 1190 शिक्षक कार्यरत आहेत.
04
विद्यार्थी संख्या
तालुक्यातील एकूण विद्यार्थी संख्या 59435
चला, आपण सर्व मिळून प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा प्रवास अर्थपूर्ण आणि यशस्वी बनवूया!
अनुसूची-अ | विद्यार्थी लाभाच्या सेवा
अ.क्र. लोकसेवेचे नाव लोकसेवा पुरविण्‍यासाठी विहित केलेली कालमर्यादा (कार्यालयाीन दिवस) पदनिर्देशित धिकारी प्रथम अपिलिय प्राधिकारी द्वितीय अपिलिय प्राधिकारी आवश्‍यक कागदपत्रे व इतर बाबी
1 विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र देणे (प्राथमिक शाळांसाठी) 7 दिवस संबंधित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संबंधित शाळेच्‍या कार्यक्षेत्राचा केंद्रप्रमुख/शहरी भागाचा वार्ड अधिकारी/तत्‍सम अधिकारी संबंधित शाळेच्‍या तालुक्‍याचा गटशिक्षणाधिकारी/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/शिक्षण अधिकारी/तत्‍सम अधिकारी 1. विद्यार्थी / पालक यांचा विनंती अर्ज
2 विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र देणे (माध्‍यमिक शाळांसाठी) 7 दिवस संबंधित माध्‍यमिक शाळांचे मुख्याध्यापक संबंधित शाळेच्‍या कार्यक्षेत्राचा केंद्रप्रमुख/शहरी भागाचा वार्ड अधिकारी/तत्‍सम अधिकारी संबंधित शाळेच्‍या तालुक्‍याचा गटशिक्षणाधिकारी/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/शिक्षण अधिकारी/तत्‍सम अधिकारी 1. विद्यार्थी / पालक यांचा विनंती अर्ज
3 विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र देणे (कनिष्‍ठ महाविद्यालयासाठी) 7 दिवस संबंधित कनिष्‍ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य संबंधित ग्रामीण भागासाठी गटशिक्षणाधिकारी संबंधित जिल्‍हयाचे शिक्षणाधिकारी माध्‍यमिक 1. विद्यार्थी / पालक यांचा विनंती अर्ज
4 विद्यार्थ्यांना व्दितीय गुणपत्रक देणे. (इ.1 ते 9वी) (प्राथमिक शाळांसाठी) 7 दिवस संबंधित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संबंधित शाळेच्‍या कार्यक्षेत्राचा केंद्रप्रमुख/शहरी भागाचा वार्ड अधिकारी/तत्‍सम अधिकारी संबंधित शाळेच्‍या तालुक्‍याचा गटशिक्षणाधिकारी/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/शिक्षण अधिकारी/तत्‍सम अधिकारी 1. विद्यार्थी / पालक यांचा विनंती अर्ज
२.प्रथम गुणपत्रक हरविलेबाबत विद्यार्थी/पालक यांचे शपथपत्र
5 विद्यार्थ्‍यांना व्दितीय गुणपत्रक देणे. (इ.5 ते 9वी) (माध्‍यमिक शाळांसाठी) 7 दिवस संबंधित माध्‍यमिक शाळांचे मुख्याध्यापक संबंधित शाळेच्‍या कार्यक्षेत्राचा केंद्रप्रमुख/शहरी भागाचा वार्ड अधिकारी/तत्‍सम अधिकारी संबंधित शाळेच्‍या तालुक्‍याचा गटशिक्षणाधिकारी/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/शिक्षण अधिकारी/तत्‍सम अधिकारी 1. विद्यार्थी / पालक यांचा विनंती अर्ज
2.प्रथम गुणपत्रक हरविलेबाबत विद्यार्थी/पालक यांचे शपथपत्र
6 विद्यार्थ्‍यांना व्दितीय गुणपत्रक देणे. (इ.11वी) (कनिष्‍ठ महाविद्यालयासाठी) 7 दिवस संबंधित कनिष्‍ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य संबंधित ग्रामीण भागासाठी गटशिक्षणाधिकारी संबंधित जिल्‍हयाचे शिक्षणाधिकारी माध्‍यमिक 1. विद्यार्थी / पालक यांचा विनंती अर्ज
2.प्रथम गुणपत्रक हरविलेबाबत विद्यार्थी/पालक यांचे शपथपत्र
7 विद्यार्थ्यांना शाळा सोडल्‍याचा दाखला देणे. (प्राथमिक शाळांसाठी) 7 दिवस संबंधित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संबंधित शाळेच्‍या कार्यक्षेत्राचा केंद्रप्रमुख/शहरी भागाचा वार्ड अधिकारी/तत्‍सम अधिकारी संबंधित शाळेच्‍या तालुक्‍याचा गटशिक्षणाधिकारी/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/शिक्षण अधिकारी/तत्‍सम अधिकारी 1. विद्यार्थी / पालक यांचा विनंती अर्ज
8 विद्यार्थ्यांना शाळा सोडल्‍याचा दाखला देणे. (माध्‍यमिक शाळांसाठी) 7 दिवस संबंधित माध्‍यमिक शाळांचे मुख्याध्यापक संबंधित शाळेच्‍या कार्यक्षेत्राचा केंद्रप्रमुख/शहरी भागाचा वार्ड अधिकारी/तत्‍सम अधिकारी संबंधित शाळेच्‍या तालुक्‍याचा गटशिक्षणाधिकारी/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/शिक्षण अधिकारी/तत्‍सम अधिकारी 1. विद्यार्थी / पालक यांचा विनंती अर्ज
9 विद्यार्थ्यांना शाळा सोडल्‍याचा दाखला देणे/TC देणे. (कनिष्‍ठ महाविद्यालयासाठी) 7 दिवस संबंधित कनिष्‍ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य संबंधित ग्रामीण भागासाठी गटशिक्षणाधिकारी संबंधित जिल्‍हयाचे शिक्षणाधिकारी माध्‍यमिक 1. विद्यार्थी / पालक यांचा विनंती अर्ज