कला दालन
कलाशिक्षक, जि.प.प्रशाला परसोडा
ता.वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर
सातपुड्याच्या कुशीत, कलेच्या मुशीत तयार झालेल्या श्री.काशिनाथ अर्जुन गावित हे कला शिक्षक गेल्या 16 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कलेचा वैजापूरच्या क्षितिजावर आपल्या कुंचल्यातून ठसा उमटवत आहेत. आजपर्यंत चित्रकला, रांगोळी च्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे हरहुन्नरी, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून तालुक्यात कार्यरत आहेत. तालुका, जिल्हा स्तरावर चित्रप्रदर्शन, रांगोळी प्रत्येक कार्यक्रमात ज्या हातांनी पुर्णत्वास जातात असे बहुगुणी शिक्षक श्रीमान काशिनाथ गावित सर.
या गुणवंत कला शिक्षकाचे काही निवडक चित्रे, रांगोळ्या, फलक लेखन आपण खालील Slide Show व्दारे बघू शकतो.