गटसाधन केंद्र (शिक्षण विभाग) पंचायत समिती वैजापूर या संकेतस्‍थळावर आपले सहर्ष स्‍वागत आहे.

प्रस्तावना

लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे टप्‍प्‍यांपैंकी एक असते. याच काळात मुलांचे बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासाचे बीज पेरले जाते. अक्षरओळख, संख्याज्ञान, संवादकौशल्य, सर्जनशीलता यासारखी मूलभूत कौशल्ये याच टप्प्यात विकसित होतात. एक प्रेमळ, सुरक्षित आणि उत्तेजन देणारे शैक्षणिक वातावरण लहान मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करते. त्यामुळे प्रत्येक पालक, शिक्षक आणि शाळेचे कर्तव्य आहे की त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी तयार करावे.
         शाळा हे केवळ ज्ञानाचे केंद्र नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे स्थान आहे. प्राथमिक शाळेत मुले समाजात वावरायला शिकतात, शिस्त, सहकार्य, आणि इतरांसोबत काम करणे यासारख्या जीवनकौशल्ये आत्मसात करतात. शिक्षकांचा मार्गदर्शन आणि प्रेमळ दृष्टिकोन मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि तर्कशक्ती विकसित होते, जे त्याच्या पुढील शिक्षणासाठी भक्कम पाया ठरतो.

वैजापूर तालुक्याचा थोडक्यात शैक्षणिक आढावा :-

  • 1) एकूण शाळा - वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषद 320 शाळा, नगरपरिषद 19 शाळा, खासगी 105 शाळा आहेत.
  • 2) अधिकारी वर्ग - तालुक्यात 1 गटशिक्षणाधिकारी, 1 शिक्षणविस्तार अधिकारी, 18 केंद्रप्रमुख अशाप्रकारे सनियंत्रण अधिकारी वर्ग कार्यरत आहे.
  • 3) शिक्षक संख्या - तालुक्यात जि. प. व्यवस्थापनाचे प्राथमिक व माध्यमिक असे एकूण 1190 शिक्षक कार्यरत आहेत.
  • 4) विद्यार्थी संख्या - तालुक्यातील एकूण विद्यार्थी संख्या 59435

गौरव वैजापूरचा-जि.प.प्रा.शा.निमगाव

शाळेविषयी थोडक्‍यात
NMMS परीक्षा
5वी शिष्‍यवृत्‍ती
8वी शिष्‍यवृत्‍ती
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव

               जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव, केंद्र शिवूर ही ग्रामीण भागात कार्यरत असणारी शाळा आहे. या शाळेने स्‍पर्धा परीक्षेच्‍या बाबतील उत्‍कृष्‍ट असे कार्य केलेल आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक NMMS शिष्यवृत्ती धारक असणारी जिल्हा परिषद शाळा म्‍हणून निमगाव शाळेचा गौरव केला जातो. या शाळेतील श्री.मनोहर लबडे सर यांची स्‍पर्धा परीक्षा पध्‍दत ही लबडे पॅटर्न म्‍हणून राज्‍यभर ओळखली जाते.

निमगाव शाळेच्‍या निकालाच्या विशेष उल्लेखनीय बाबीं....
📌सातत्यपूर्ण सलग 5 व्याही वर्षी निकाल उंचावणारी शाळा...
📌आज पर्यंत प्रविष्ट-194, उत्तीर्ण-162, तर 153 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (NMMS-119) सारथी-34 मिळवून देणारी शाळा...
📌आजपर्यंत सुमारे 77 लाख शिष्यवृत्ती मिळवणारी जिल्हा परिषद शाळा...
📌NMMSच्या उल्लेखनीय निकालामुळे प्रस्तावाविना शाळेतील शिक्षकास विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त होणारी एकमेव जिल्हा परिषद शाळा...
📌सर्वांगिण व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व विविध शालेय स्पर्धा परीक्षेतील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी निपुण भारत अंतर्गत उपक्रमशील पुरस्कारासाठी निवड झालेली शाळा...
📌 सन 2024-25 ला सलग दुसऱ्या वर्षी शिक्षक दिनी नवोपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मान..

🟣 शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सूरय्या शेख
NMMS मार्गदर्शक-
🔘 श्री मनोहर भास्कर लबडे
🔘 श्रीमती पूजा दिनकर जगदाळे
🔘 श्री संजय मारुती घुगे
🔘 श्रीमती तृप्ती भास्करराव व्यवहारे
🔘 श्री गणेश कडुबा ठुबे
🔘 श्रीमती रूपाली शिवाजी खांडगौरे

जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2019-20
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
16080600
1) जिल्ह्यात प्रथम: शुभम आप्‍पासाहेब सामृत
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-21
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
26201600
1) जिल्ह्यात प्रथम: प्रतिक्षा विजय सामृत
2) जिल्ह्यात द्वितीय: गीतांजली गोरखनाथ जाधव
3) जिल्ह्यात तृतीय: तृप्‍ती नानासाहेब त्रिभुवन
विशेष बाब :- कोराेनामुळे शाळा बंद...संपुर्ण लॉकडाउन.....परीक्षेसंदर्भांत अनिश्चितता...तरीही विशेष उल्‍लेखनीय कामगिरी.
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
31262006
विशेष बाब :- कोरोनामुळे शाळा बंद असतानाही सर्वाधिक शिष्‍यवृत्‍तीधारक होणारी राज्‍यातील एकमेव जिल्‍हा परिषद शाळा निमगाव
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022-23
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
31281810
विशेष बाब :- पुन्‍हा एकदा सर्वाधिक शिष्‍यवृत्‍तीधारक होण्‍याचा मान मिळवणारी एकमेव जिल्‍हा परिषद शाळ निमगाव
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2023-24
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
38332408
-
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2024-25
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
52473510
विशेष बाब :- सलग 4थ्‍या वर्षीही सर्वाधिक शिष्‍यवृत्‍तीधारक विद्यार्थी होण्‍याचा मान पटकावणारी जिल्‍हा परिषदेची एकमेव उपक्रमशील शाळा निमगाव.
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव
अ.क्र. शैक्षणिक वर्ष प्रविष्‍ठ विद्यार्थी उत्‍तीर्ण विद्यार्थी शिष्‍यवृत्‍ती धारक
01 2019-20 08 00 00
02 2020-21 10 00 00
03 2021-22 14 02 01
04 2022-23 22 04 01
05 2023-24 19 00 00
06 2024-25 40 02 -
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव
अ.क्र. शैक्षणिक वर्ष प्रविष्‍ठ विद्यार्थी उत्‍तीर्ण विद्यार्थी शिष्‍यवृत्‍ती धारक
01 2019-20 10 02 00
02 2020-21 16 04 03
03 2021-22 12 02 00
04 2022-23 20 03 00
05 2022-23 28 02 00
06 2024-25 55 23 अंदाजे 12