गटसाधन केंद्र (शिक्षण विभाग) पंचायत समिती वैजापूर या संकेतस्‍थळावर आपले सहर्ष स्‍वागत आहे.

प्रस्तावना

Books Logo
लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या आयुष्याची सर्वात महत्वाचे टप्प्यांपैकी एक असते. याच काळात मुलांचे बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासाचे बीज पेरले जाते. अक्षरओळख, संख्याज्ञान, संवादकौशल्य, सर्जनशीलता यासारखी मुलभूत कौशल्ये याच टप्प्यात विकसित होतात. एक प्रेमळ, सुरक्षित आणि ऊर्जा भरले शैक्षणिक वातावरण लहान मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करते. त्यामुळे प्रत्येक पालक, शिक्षक आणि शाळेचे कर्तव्य आहे की त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया मजबूत करून भावी उज्ज्वल भविष्यासाठी तयार करावे.
School Logo
शाळा हे केवळ ज्ञानाचे केंद्र नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे स्थान आहे. प्राथमिक शाळेत मुले समाजात वावरायला शिकतात, शिस्त, सहकार्य, आणि इतरांशी संवाद करणे यासारखी जीवनकौशल्ये आत्मसात करतात.
Students Logo
प्राथमिक शाळेचे महत्व

आत्मविश्वासाची निर्मिती

प्राथमिक शिक्षण मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि तर्कशक्ती विकसित होते, जे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी भक्कम पाया ठरते.

मूल्ये आणि संस्कार

शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेमळ वातावरणात मुलांमध्ये मूल्ये, शिस्त, सहकार्य, आणि इतरांबद्दल आदर भावना निर्माण होते.

सर्वांगीण विकास

शैक्षणिक ज्ञानाबरोबरच क्रीडा, कला, कथा, गाणी, नाट्य यांसारख्या उपक्रमातून मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास होतो.

उज्ज्वल भविष्यासाठी तयारी

प्राथमिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी मुलांना पुढील शिक्षणात आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तयार करते.

★ ★ ★ वैजापूर तालुक्याची शैक्षणिक माहिती ★ ★ ★
01
एकूण शाळा
वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषद 320 शाळा, नगरपरिषद 19 शाळा, खाजगी 105 शाळा आहेत.
02
अधिकारी वर्ग
तालुक्यात 1 गटशिक्षणाधिकारी, 18 केंद्रप्रमुख अशाप्रकारे संनियंत्रण अधिकारी वर्ग कार्यरत आहे.
03
शिक्षक संख्या
तालुक्यात जि. प. व्यवस्थापनाचे प्राथमिक व माध्यमिक असे एकूण 1190 शिक्षक कार्यरत आहेत.
04
विद्यार्थी संख्या
तालुक्यातील एकूण विद्यार्थी संख्या 59435
चला, आपण सर्व मिळून प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा प्रवास अर्थपूर्ण आणि यशस्वी बनवूया!

गौरव वैजापूरचा-जि.प.प्रा.शा.चांडगाव

🏫 शाळेविषयी
🎓 नवोदय
📘 5वी शिष्‍यवृत्ती
📚 इतर स्पर्धा परीक्षा
🖼️ छायाचित्रे

जि.प.प्रा.शा.चांडगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडगाव केंद्र-आघुर. ग्रामीण भागातील अशीच अतिशय दर्जेदार शिक्षण देणारी एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी उत्कृष्ट पद्धतीने करून घेतल्या जाते. श्री.गोरखनाथ त्रिभुवन सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतून 2018 पासून आतापर्यंत दरवर्षी सातत्याने नवोदय परीक्षेत मुलं पात्र होतात. या एकाच शाळेचे आतापर्यंत एकूण 15 विद्यार्थी नवोदय पात्र झाले असून जिल्हातील कदाचित ही जिल्हापरीषदेची एकमेव शाळा असेल. याच बरोबर सैनिक स्कुल, शिष्यवृत्ती, मंथन, ऑलम्पियाड तसेच सी.व्ही. रमण, मी ज्ञानी होणार यांसारख्या परीक्षेत देखील राज्यस्तरीय यश शाळेने संपादित केले आहे.

जि.प.प्रा.शा.चांडगाव

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी पात्र विद्यार्थी संख्या

अ.क्र. शैक्षणिक वर्ष सहभागी विद्यार्थी पात्र विद्यार्थी संख्या
1 2020-21 09 03
2 2021-22 10 04
3 2022-23 13 09
4 2023-24 11 05
5 2024-25 42 19

जि.प.प्रा.शा.चांडगाव

इतर स्पर्धा परीक्षा

  • मंथन राज्य स्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा
  • MTS ओलंपियाड स्पर्धा परीक्षा
  • अखिल भारतीय सैनिक स्कूल स्पर्धा परीक्षा
  • डॉ. सी. व्ही. रमन स्पर्धा परीक्षा
  • मी ज्ञानी होणार स्पर्धा परीक्षा
  • भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा

निवडक छायाचित्रे

Slide 1
जि.प.प्रा.शाळा चांडगाव वैजापूर पासून ९ कि.मी. अंतर असून २ हजार ते अडीच हजार लोकवस्ती असलेले गाव.
निसर्ग सौंदर्याने नटलेली ही शाळा, दरवर्षी गुणवत्तेत तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
Slide 2
--
Slide 3
मा.आमदार बोरनारे सर व मा.शिक्षणाधिकारी जि.प.छत्रपती संभाजीनगर यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांच्‍या गुणवत्‍तेची दखल घेतली.
Slide 4
बातमी
Slide 5
बातमी