गटसाधन केंद्र (शिक्षण विभाग) पंचायत समिती वैजापूर या संकेतस्‍थळावर आपले सहर्ष स्‍वागत आहे.

प्रस्तावना

Books Logo
लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या आयुष्याची सर्वात महत्वाचे टप्प्यांपैकी एक असते. याच काळात मुलांचे बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासाचे बीज पेरले जाते. अक्षरओळख, संख्याज्ञान, संवादकौशल्य, सर्जनशीलता यासारखी मुलभूत कौशल्ये याच टप्प्यात विकसित होतात. एक प्रेमळ, सुरक्षित आणि ऊर्जा भरले शैक्षणिक वातावरण लहान मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करते. त्यामुळे प्रत्येक पालक, शिक्षक आणि शाळेचे कर्तव्य आहे की त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया मजबूत करून भावी उज्ज्वल भविष्यासाठी तयार करावे.
School Logo
शाळा हे केवळ ज्ञानाचे केंद्र नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे स्थान आहे. प्राथमिक शाळेत मुले समाजात वावरायला शिकतात, शिस्त, सहकार्य, आणि इतरांशी संवाद करणे यासारखी जीवनकौशल्ये आत्मसात करतात.
Students Logo
प्राथमिक शाळेचे महत्व

आत्मविश्वासाची निर्मिती

प्राथमिक शिक्षण मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि तर्कशक्ती विकसित होते, जे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी भक्कम पाया ठरते.

मूल्ये आणि संस्कार

शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेमळ वातावरणात मुलांमध्ये मूल्ये, शिस्त, सहकार्य, आणि इतरांबद्दल आदर भावना निर्माण होते.

सर्वांगीण विकास

शैक्षणिक ज्ञानाबरोबरच क्रीडा, कला, कथा, गाणी, नाट्य यांसारख्या उपक्रमातून मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास होतो.

उज्ज्वल भविष्यासाठी तयारी

प्राथमिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी मुलांना पुढील शिक्षणात आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तयार करते.

★ ★ ★ वैजापूर तालुक्याची शैक्षणिक माहिती ★ ★ ★
01
एकूण शाळा
वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषद 320 शाळा, नगरपरिषद 19 शाळा, खाजगी 105 शाळा आहेत.
02
अधिकारी वर्ग
तालुक्यात 1 गटशिक्षणाधिकारी, 18 केंद्रप्रमुख अशाप्रकारे संनियंत्रण अधिकारी वर्ग कार्यरत आहे.
03
शिक्षक संख्या
तालुक्यात जि. प. व्यवस्थापनाचे प्राथमिक व माध्यमिक असे एकूण 1190 शिक्षक कार्यरत आहेत.
04
विद्यार्थी संख्या
तालुक्यातील एकूण विद्यार्थी संख्या 59435
चला, आपण सर्व मिळून प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा प्रवास अर्थपूर्ण आणि यशस्वी बनवूया!

गौरव वैजापूरचा-जि.प.प्रा.शा.नारळा

शाळेविषयी थोडक्‍यात
NMMS परीक्षा
5वी शिष्‍यवृत्‍ती
8वी शिष्‍यवृत्‍ती
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नारळा

               जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नारळा, केंद्र जानेफळ, ता.वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर ही शाळा ग्रामीण भागात कार्यरत असुन या शाळेने सन 2018 पासून विद्यार्थ्‍यांची विविध स्‍पर्धा परीक्षेची तयारी करुन त्‍यांना अतिशय चांगल्‍या प्रकारचे यश संपादन केले आहे. वैजापूर तालुक्‍यात स्‍पर्धा परीक्षेकरीता नावाजलेली अशी ही शाळा आहे. या शाळेचे मुख्‍याध्‍यापक श्री.साळुंके सर, स्‍पर्धा परीक्षा मागदर्शक श्री.नागेश जाधव सर, श्री.तुपे सर, श्री.साेनवणे सर, श्रीम.चव्‍हाण मॅडम, श्रीम.शेजूळ मॅडम, श्रीम.जोपळे मॅडम हे सर्वच विद्यार्थ्‍यांच्‍या प्रगतीसाठी, गुणवत्‍तेसाठी सतत मेहनत घेत असतात. अशा या गुणवत्‍तापुर्ण शाळेचे स्‍पर्धा परीक्षेतील यश पुढीलप्रमाणे आहे.

जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नारळा
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2019-20
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
080606-
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-21
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
12070502
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
23201306
1) जिल्ह्यात प्रथम: 148 गुण - पवन आबाराव खिल्‍लारे
2) जिल्ह्यात द्वितीय: 148 गुण - गीतांजली वाल्मिक काळे
3) जिल्ह्यात तृतीय: 142 गुण - गणेश गंगाधर गोराणे
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022-23
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
17141102
1) जिल्ह्यात प्रथम: 150 गुण - सारिका दादाभाउ सोमासे (राज्यात 15वा)
2) जिल्ह्यात द्वितीय: 149 गुण - गौरव अप्‍पासाहेब सोमासे (राज्यात 16वा)
3) जिल्ह्यात तृतीय: 125 गुण - सौरव पंढरीनाथ आहेर
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2023-24
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
30272303
1) जिल्ह्यात प्रथम: 162 गुण - ओमकार नवनाथ आहेर (राज्यात 6वा)
2) जिल्ह्यात द्वितीय: 161 गुण - रोशन नवनाथ गोराणे (राज्यात 7वा)
3) जिल्ह्यात तृतीय: 155 गुण - कल्याण रविंद्र आहेर (राज्‍यात 13वा)
NMMS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2024-25
प्रविष्‍ठ विद्यार्थीउत्‍तीर्णNMMS धारकसारथी धारक
42312505
1) जिल्ह्यात प्रथम: 161 गुण - गायत्री ज्ञानेश्‍वर खिल्‍लारे (राज्यात 3रा)
2) जिल्ह्यात द्वितीय: 156 गुण - मयुरी अप्‍पासाहेब सोमासे (राज्यात 8वा)
3) जिल्ह्यात तृतीय: 144 गुण - शुभम जालिंदर काळे
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नारळा
अ.क्र. शैक्षणिक वर्ष प्रविष्‍ठ विद्यार्थी उत्‍तीर्ण विद्यार्थी शिष्‍यवृत्‍ती धारक
01 2021-22 09 09 02
02 2022-23 09 04 00
03 2023-24 09 04 00
04 2024-25 15 07 01
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नारळा
अ.क्र. शैक्षणिक वर्ष प्रविष्‍ठ विद्यार्थी उत्‍तीर्ण विद्यार्थी शिष्‍यवृत्‍ती धारक
01 2019-20 09 05 03
02 2020-21 09 04 02
03 2021-22 13 13 13
04 2022-23 13 07 05
05 2024-25 36 22 16