गटसाधन केंद्र (शिक्षण विभाग) पंचायत समिती वैजापूर या संकेतस्‍थळावर आपले सहर्ष स्‍वागत आहे.

प्रस्तावना

Books Logo
लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या आयुष्याची सर्वात महत्वाचे टप्प्यांपैकी एक असते. याच काळात मुलांचे बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासाचे बीज पेरले जाते. अक्षरओळख, संख्याज्ञान, संवादकौशल्य, सर्जनशीलता यासारखी मुलभूत कौशल्ये याच टप्प्यात विकसित होतात. एक प्रेमळ, सुरक्षित आणि ऊर्जा भरले शैक्षणिक वातावरण लहान मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करते. त्यामुळे प्रत्येक पालक, शिक्षक आणि शाळेचे कर्तव्य आहे की त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया मजबूत करून भावी उज्ज्वल भविष्यासाठी तयार करावे.
School Logo
शाळा हे केवळ ज्ञानाचे केंद्र नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे स्थान आहे. प्राथमिक शाळेत मुले समाजात वावरायला शिकतात, शिस्त, सहकार्य, आणि इतरांशी संवाद करणे यासारखी जीवनकौशल्ये आत्मसात करतात.
Students Logo
प्राथमिक शाळेचे महत्व

आत्मविश्वासाची निर्मिती

प्राथमिक शिक्षण मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि तर्कशक्ती विकसित होते, जे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी भक्कम पाया ठरते.

मूल्ये आणि संस्कार

शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेमळ वातावरणात मुलांमध्ये मूल्ये, शिस्त, सहकार्य, आणि इतरांबद्दल आदर भावना निर्माण होते.

सर्वांगीण विकास

शैक्षणिक ज्ञानाबरोबरच क्रीडा, कला, कथा, गाणी, नाट्य यांसारख्या उपक्रमातून मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास होतो.

उज्ज्वल भविष्यासाठी तयारी

प्राथमिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी मुलांना पुढील शिक्षणात आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तयार करते.

★ ★ ★ वैजापूर तालुक्याची शैक्षणिक माहिती ★ ★ ★
01
एकूण शाळा
वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषद 320 शाळा, नगरपरिषद 19 शाळा, खाजगी 105 शाळा आहेत.
02
अधिकारी वर्ग
तालुक्यात 1 गटशिक्षणाधिकारी, 18 केंद्रप्रमुख अशाप्रकारे संनियंत्रण अधिकारी वर्ग कार्यरत आहे.
03
शिक्षक संख्या
तालुक्यात जि. प. व्यवस्थापनाचे प्राथमिक व माध्यमिक असे एकूण 1190 शिक्षक कार्यरत आहेत.
04
विद्यार्थी संख्या
तालुक्यातील एकूण विद्यार्थी संख्या 59435
चला, आपण सर्व मिळून प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा प्रवास अर्थपूर्ण आणि यशस्वी बनवूया!

गौरव वैजापूरचा-जि.प.प्रा.शा.भिसेवाडी

🏫 शाळेविषयी
👨‍👩‍👧‍👦 पटसंख्‍या
🤝 लोकसहभाग
📰 Ele.News
🎯 उपक्रम
🏆 यशोगाथा

जि.प.प्रा.शा.भिसेवाडी

जि.प.प्रा.शा.भिसेवाडी ही वैजापूर तालुक्‍यातील लासूरगाव केंद्रात कार्यरत असलेली जिल्‍हा परिषदेची शाळा आहे. सदर शाळेतील शिक्षक श्री. फेरोज शेख खूप मेहनत घेवून विद्यार्थ्‍यांना केवळ पुस्‍तकी ज्ञान न देता प्रत्‍यक्ष अध्‍ययन अनुभव देतात. त्‍यामुळे सदर शाळा व शाळेतील विद्यार्थी यांनी पुर्ण जिल्‍हयात नाव गौरविले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसेवाडी
केंद्र: लासूरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
पटसंख्या वाढ अहवाल
अ. क्र शैक्षणिक वर्ष पटसंख्या झालेली वाढ सुरवात ते एकूण वाढ शेकडा वाढ
12018 - 1914 ते 1400000 %
22019 - 2014 ते 18040428 %
32020 - 2114 ते 24061071 %
42021 - 2214 ते 2501 (कोरोना वर्ष)1179 %
52022 - 2314 ते 330819135 %
62023 - 2414 ते 400726185 %
72024 - 2514 ते 470733235 %

गंगापूर – वैजापूर तालुक्यातील 13 गावांतून खाजगी / इंग्रजी माध्यमातून दाखल झालेले एकूण विद्यार्थी 41
सन 2024-25 मध्ये भिसेवाडी वस्तीतील प्रवेश फक्त 01

पालक, सामाजिक कार्यकर्ते, गावकरी, शिक्षक यांच्याकडून प्राप्त लोकसहभाग
सर्व माध्यमातून शाळेस आलेल्या वस्तूंचे लोकसहभागातील मूल्य : 6,79,800/-
  1. नवीन शाळा बांधकामासाठी प्रकाश रामराव भिसे यांच्याकडून तीन गुंठे जागा मोफत दान. (शासकीय मूल्य.430000/-)
  2. लोकवर्गणीतून 32 इंच स्मार्ट TV. एक गावकरी व एक ग्रामपंचायततर्फे भेट. (मूल्य.16500/-)
  3. संपूर्ण खेळाचे साहित्य पालकांकडून भेट. (मूल्य.17900/-)
  4. जुना इमारतीस लाईट फिटिंग, पाण्याचे जार व धर्मास पालकांतर्फे भेट. (मूल्य.4800/-)
  5. 14 महापुरुषांची फोटो गावकरी व पालकांतर्फे भेट. (मूल्य.3700/-)
  6. चार फॅन, 02 संचय हुमे शिक्षक व 02 पालकांतर्फे भेट. (मूल्य.6000/-)
  7. विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचा प्लांट मा. राजेश जंगले ACTIVE ASSOCIATES यांच्यातर्फे शाळेला भेट. (मूल्य.82000/-)
  8. नवीन संपूर्ण इमारतीस रंगरंगोटी पालकांतर्फे. (मूल्य.26000/-)
  9. नवीन इमारतीस लाईट फिटिंग पालकांतर्फे. (मूल्य.13500/-)
  10. झेंडा वटा बांधकाम SBI बँक कर्मचारी व पालक यांच्यातर्फे. (मूल्य.16800/-)
  11. नवीन इमारती समोरील 30 टाइल्स मुस्लिम गावकरी तर्फे. (मूल्य.18000/-)
  12. हरित क्रांती प्रतिष्ठान यांच्यांतर्फे 30 झाडे शाळेला भेट. (मूल्य.3800/-)
  13. फेरोज शेख यांचे माजी शिक्षक यांच्यांतर्फे फोल व ताशा शाळेस भेट. (मूल्य.4800/-)
  14. 1967 पासून शाळेत एकच वर्गखोली असल्यामुळे दोन शिक्षक एका खोलीत शिकवू शकत नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून एक रूम भाडे तत्वावर घेऊन दोन वर्ग भरवून त्याचे भाडे शिक्षकांनी दिले. (मूल्य.36000/-)

जि.प.प्रा.शा.भिसेवाडी

विविध इलेक्‍ट्रॉनिक मेडीयाने घेतली दखल

अ.क्र. तपशिल युटयुब लिंक
1 विद्यार्थ्‍यांची विमानतळावर सहल Video Thumbnail
2 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस Video Thumbnail
3 भिसेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत पोळा उत्साहात साजरा Video Thumbnail
4 गावात आढळला नाही एकही कोरोना रुग्ण Video Thumbnail
5 मतदार जनजागृती Video Thumbnail

जि.प.प्रा.शा.भिसेवाडी

शाळेचे उपक्रम

  1. कृतियुक्त 19 खडी.
  2. एक ते शंभर अंक आठ पद्धतीने वाचन.
  3. रांगोळी ताटात मुळाक्षरे, व्यंजन, एबीसीडी व अंक गिरवणे.
  4. इंग्रजी अँक्शन.
  5. आकाश दर्शन टेलिस्कोपद्वारे.
  6. 20 रुपयाच्या आतल्या विज्ञानाच्या प्रयोगांची माहिती सांगणे.
  7. वैज्ञानिक संत व महात्मा यांचे रोल सादरीकरण करणे.
  8. परमवीर चक्र विजेते, ऑलिंपिक खेळाडू यांची माहिती सांगणे.
  9. सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर घेणे.
  10. इंग्रजी शब्दांच्या भेंड्या.
  11. झूम मीटिंग द्वारे उच्चपदस्थ व्यक्तींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
  12. उन्हाळ्यात एक हात मदतीचा पक्ष्यांसाठी.
  13. उन्हाळ्या सुटीतील व दिवाळी सुटीतील अभ्यास प्रिंट.

यशोगाथा

आमच्या शाळेचे यश खालीलप्रमाणे :